शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

लोणावळ्यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या घरमालकाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 18:09 IST

भाडेकरू म्हणुन ठेवलेल्या एका 13 वर्षे वयाच्या मुलीवर मागील एक वर्षापासुन वेळोवेळी बलात्कार केला आहे.

लोणावळा : मागील एक वर्षापासून अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी लोणावळ्यातील एका 40 वर्षीय इसमाला लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज दिगंबर कारंडे (वय 40 वर्षे सध्या रा. निसर्ग नगरी सोसायटी, लोणावळा. मूळ राहणार कैलास नगर, लोणावळा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या घरात भाडेकरू म्हणुन ठेवलेल्या एका अनुसुचित जाती जमातीतील 13 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षापासुन वेळोवेळी बलात्कार केला आहे. त्याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल माणिक आहिनवे व आजिज मेस्त्री यांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली.

ह्या गुन्हयात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा लावण्यात आल्याने गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कॉवत हे करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक