१३ वर्षांच्या मुलाने चाकूने वार करून केला वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:12 IST2021-05-21T04:12:14+5:302021-05-21T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भावंडांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये वडील रागविल्यामुळे १३ वर्षांच्या मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा खून ...

A 13-year-old boy stabbed his father to death | १३ वर्षांच्या मुलाने चाकूने वार करून केला वडिलांचा खून

१३ वर्षांच्या मुलाने चाकूने वार करून केला वडिलांचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भावंडांमध्ये झालेल्या भांडणांमध्ये वडील रागविल्यामुळे १३ वर्षांच्या मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव येथील जांभूळवाडी रोड येथे घडला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

दस्तगीर इमाम शेख (वय ४०, रा. सिद्धिविनायक सोसायटी, जांभूळवाडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली.

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले की, दस्तगीर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दस्तगीर यांना चार मुले आहेत. मोठा मुलगा व त्याची बहीण यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली होती. दोघांची भांडणे सोडविण्यासाठी दस्तगीर गेले होते. मोठ्या १३ वर्षांच्या मुलाला भांडणाबद्दल रागावून त्यांनी त्याला मारले. त्यामुळे रागाच्या भरात मुलगा घरात गेला. घरातून चाकू आणून या मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसला. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: A 13-year-old boy stabbed his father to death