पोहताना १३ वर्षाचा मुलगा बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:13 IST2021-09-21T04:13:39+5:302021-09-21T04:13:39+5:30

पुणे : ताडीवाला झोपडपट्टीला लागून असलेल्या नदीपात्रात पोहताना एक १३ वर्षाचा मुलगा बुडाला. मल्लिकार्जुन गवलिंग म्हेत्रे (वय १३, ...

A 13-year-old boy drowned while swimming | पोहताना १३ वर्षाचा मुलगा बुडाला

पोहताना १३ वर्षाचा मुलगा बुडाला

पुणे : ताडीवाला झोपडपट्टीला लागून असलेल्या नदीपात्रात पोहताना एक १३ वर्षाचा मुलगा बुडाला. मल्लिकार्जुन गवलिंग म्हेत्रे (वय १३, रा. कर्नाटक) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. अद्याप मात्र त्याचा शोध लागलेला नाही. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.

मल्लिकार्जुन हा मूळचा कर्नाटक येथील आहे. दीड महिन्यांपूर्वी तो पुण्यात आजोबाकडे आला होता. रविवारी एका मित्रासोबत तो येथील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो नदीच्या पाण्यात बुडाला. त्याला पोहता येत होते. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात शोध घेतला मात्र उशिरापर्यंत तो मिळून आला नाही. शेवटी अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारीदेखील त्याचा शोध घेतला तरीदेखील तो मिळून आला नाही.

Web Title: A 13-year-old boy drowned while swimming