१३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये बदल

By Admin | Updated: May 13, 2017 04:53 IST2017-05-13T04:53:27+5:302017-05-13T04:53:27+5:30

पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. यामधील काही पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या

13 Transfers of police inspectors changed | १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये बदल

१३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. यामधील काही पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या सध्याच्या नियुक्ती ठिकाणावरून इतरत्र बदली मिळण्याची विनंती केल्याने १३ पोलीस निरीक्षकांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या आहेत.
संजय कुरूंदकर यांची आर्थिक गुन्हे शाखा बदली रद्द करून, मुंढवा पोलीस ठाण्यात, तर संजय नाईक पाटील यांची विमानतळ पोलीस ठाण्याची बदली रद्द करून विश्रांतवाडीत नेमणूक करण्यात आली आहे. रेखा साळुंखे यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यावरून अलंकार पोलीस ठाणे, तर येथील मिलिंद गायकवाड यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे
येथे बदली झाली आहे. अनिल पात्रुडकर यांची गुन्हे शाखेवरून मुंढवा पोलीस ठाणे, प्रमोद पत्की यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. चंद्रकांत ठाकूर (वाचक-दक्षिण प्रादेशिक विभाग ते आर्थिक गुन्हे शाखा, वैशाली गलांडे (बंडगार्डन ३ ते चतु:शृंगी, गुन्हे, कमलाकर ताकवले (वाहतूक शाखा ते विश्रांतवाडी), नितीन रं. कुलकर्णी (शिवाजीनगर कोर्ट ते गुन्हे शाखा), संजीव पाटील (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), यु. बी. शिंगाडे (चतु:शृंगी
गुन्हे ते शिवाजीनगर न्यायालय),
डी. एस. मालसिंग (नियंत्रण कक्ष ते बंडगार्डन ३) यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: 13 Transfers of police inspectors changed