शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिनी मांजा बाळगल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:29 IST

चिनी मांजा बाळगल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी ६ पोलीस ठाण्यात १० गुन्हे बुधवारपर्यंत दाखल झाले आहेत,

पुणे : चिनी मांजा बाळगल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी ६ पोलीस ठाण्यात १० गुन्हे बुधवारपर्यंत दाखल झाले आहेत़चिनी नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा मुजुमदार यांचे रविवारी निधन झाले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना चिनी मांजाची विक्री करणाºयांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले होते़ गुन्हे शाखेने चिनी मांजा बाळगणाºयांचा शोध घेण्यासाठी ७ पथके तयार केली होती़याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने वाकड येथील दोन व्यापाºयांना पकडून त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले होते़ त्यानंतर शहरातील वारजे, खडक, कोथरूड, स्वारगेट, वाकड, येरवडा या पोलीस ठाण्यांत आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, १३ आरोपींवर हे गुन्हे दाखलकरण्यात आले असल्याचीमाहिती सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी दिली़कोथरूड, स्वारगेट, वाकड, येरवडा या पोलीस ठाण्यांत प्रत्येकी २ गुन्हे दाखल असून वारजे, खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे़आतापर्यंत या १० गुन्ह्यांत एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे़ शहरात चिनी मांजा विकणारे विक्रेते व चिनी मांजाचा वापर करून पतंग उडविणाºयांचा पोलीस शोध घेत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी सांगितले, की नदीपात्रात पतंग उडविणाºया मुलांना पकडून आपण त्यांच्याकडील मांजाची तपासणी केली; परंतु त्यांच्याकडे साधा मांजा होता़ असे पतंग उडविणाºया ९ मुलांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या पालकांना बोलावून नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे़चिनी मांजामुळे एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण होतअसेल, तर मुंबई पोलीस अ‍ॅक्ट१८८ नुसार पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे़या गुन्ह्यात ६ महिन्यांपर्यंत कारावास आणि १ हजार रुपये दंडाचीशिक्षा होऊन शकते़ त्यामुळे पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़चिनी मांजासंदर्भात महापालिकेत बैठकचिनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असताना सध्या सर्रास सर्वत्र त्यांची विक्री होत आहे. याची महापौर मुक्ता टिळक यांनी गंभीर दखल घेतली असून, शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजता महापालिकेच्या सभागृहात संबंधित सर्व यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक आयोजित केली आहे.पुण्यातल्या भरगर्दीच्या शनिवारवाड्यासमोरच्या रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये आॅफिसमधून घरी जाताना कटलेला पतंगच्या मांजाने महिलेचा गळा कापला गेला. चिनी नायलॉन मांजाविक्रीवर कायद्याने बंदी आहे, तरीही विक्री सुरू आहे. याबाबत तातडीने कडक उपाय-योजना करण्यासाठी पोल्ीास, महापालिका अधिकारी, पतंगप्रेमी नागरिक यांची शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा