उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुण्यातून विमानाच्या १२ फेऱ्या केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:30 AM2024-01-19T11:30:19+5:302024-01-19T11:30:33+5:30

पुण्याहून निघणारी ६ आणि पुण्यात येणारी ६ अशी एकूण १२ उड्डाणे रद्द केली आहेत....

12 flights from Pune have been canceled due to bad weather in the north | उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुण्यातून विमानाच्या १२ फेऱ्या केल्या रद्द

उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुण्यातून विमानाच्या १२ फेऱ्या केल्या रद्द

पुणे : उत्तरेकडील खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरील विमान उड्डाणांच्या फेऱ्या सातत्याने रद्द होत आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून हे सत्र सलग सुरू असून गुरुवारी देखील १२ उड्डाणे रद्द झाली. यामध्ये पुण्याहून निघणारी ६ आणि पुण्यात येणारी ६ अशी एकूण १२ उड्डाणे रद्द केली आहेत.

हैदराबाद, मंगळुरू, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, गोवा, कर्नाटक अशी येणारी व जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याची माहिती विमान प्रशासनाने दिली आहे. यामुळे सुमारे सातशे ते आठशे विमान प्रवाशांचा नियोजित प्रवास थांबला असून, दरम्यान संबंधित विमान कंपन्यांना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून विमानतळ टर्मिनलवर प्रवाशांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

Web Title: 12 flights from Pune have been canceled due to bad weather in the north

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.