सोनसाखळीचोरीचे १२ गुन्हे उघडकीस
By Admin | Updated: August 8, 2015 00:51 IST2015-08-08T00:51:51+5:302015-08-08T00:51:51+5:30
शहरातील विविध भागांमध्ये महिलांची सोनसाखळी लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली. या चोरट्यांकडून १२ गुन्हे उघडकीस

सोनसाखळीचोरीचे १२ गुन्हे उघडकीस
पुणे : शहरातील विविध भागांमध्ये महिलांची सोनसाखळी लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केली. या चोरट्यांकडून १२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
सफिर ऊर्फ शब्बीर फिरोज खान/इराणी (वय २६, रा. दत्तवाडी), हसनसादीक शेखूअली बेग/इराणी (वय १९, रा. शिवाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना ३० जुलै रोजी नवी सांगवी येथील काटेपूरम चौकामधून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून त्या वेळी ४ मोबाईल आणि सॅक मिळाली होती. आरोपींनी गेल्या सहा महिन्यांत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळीचोरीचे गुन्हे केले आहेत. आरोपींकडून सांगवी, अलंकार, सिंहगड, भारती विद्यापीठ, विश्रांतवाडी, दत्तवाडी, मार्केट यार्ड, वारजे माळवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. (प्रतिनिधी)