महापालिकेतील ११७ लिपिकांच्या बदल्या
By Admin | Updated: June 6, 2015 23:38 IST2015-06-06T23:38:05+5:302015-06-06T23:38:05+5:30
महापालिकेने ११७ लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात महापालिका भवन, वायसीएम, क्षेत्रीय कार्यालये आदी विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महापालिकेतील ११७ लिपिकांच्या बदल्या
पिंपरी : महापालिकेने ११७ लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात महापालिका भवन, वायसीएम, क्षेत्रीय कार्यालये आदी विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व लिपिकांनी मंगळवारी (दि. ९) पदावर रुजू होणे गरजेचे आहे.
बदली दिलेल्या जागेवर कर्मचारी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच, परस्पर रजेवर गेल्यास अथवा गैरहजर राहिल्यास, दबाव आणल्यास सदर कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्यात येणार आहे, असा आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी दिलेला आहे.
प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांच्या शिफ ारशी, कर्मचारी विनंती बदली, कालावधीनिहाय बदली, कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बदल्या केल्या आहेत.
यानंतरच्या मागणीचा बदलीसाठी विचार करण्यात येणार नाही, असे प्रशासन अधिकारी मेहेर लहारे यांनी सांगितले.
काही लिपिकांना बदली नको आहे, यासाठी प्रशासनाकडे हालचाली सुरू केल्या आहेत. काही जणांना दिलेल्या विभागात काम करणे अवघड वाटत आहे. यामुळे विभागप्रमुखांची मनधरणी सुरू आहे. मात्र, दिलेल्या बदल्यांमध्ये बदल केले जाणार नाहीत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)