१८ जागांसाठी ११७ उमेदवार
By Admin | Updated: August 8, 2015 00:45 IST2015-08-08T00:45:24+5:302015-08-08T00:45:24+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आठ अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्यामुळे १८ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर. माळी यांनी दिली

१८ जागांसाठी ११७ उमेदवार
मंचर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आठ अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्यामुळे १८ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर. माळी यांनी दिली.
१९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १९ जागांसाठी १२६ उमेदवारांचे अर्ज आले होते. कृषी प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघात प्रमोद दिनकर वळसे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. उमेदवारी अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली, त्यात आठ अर्ज बाद झाले आहेत.
कृषी पतसंस्था सर्वसाधारण गटात अशोक बाजीराव मोढवे, सीताराम दामू आवटे, सतिश निवृत्ती थोरात यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. इतर मागास प्रवर्गात रवींद्र सावळेराम वाघमारे व अनुसूचित जमातीमध्ये मकबूल याकुबभाई इनामदार यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारणमध्ये आनंदा चिंतामण जाधव, अनुसूचित जाती - जमातीमध्ये देहू पुनाजी कोकाटे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटात तुषार रामदास पवळे यांचे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी दिली. २४ व २५ आॅगस्ट रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान कृषी पतसंंस्था सर्वसाधारण गटात माजी सरपंच अशोक बाजीराव मोढवे यांचा उमेदवारी अर्ज कुटुंबातील व्यक्ती अनुज्ञाप्तीधारक असल्यामुळे बाद करण्यात आला. या निर्णयाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भात जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयात दाद मागणार असल्याचे तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले व अरुण गिरे यांनी सांगितले. (वार्ताहर)