पालिकेतील ११० कर्मचारी एकावेळी सेवानिवृत्त
By Admin | Updated: June 2, 2014 00:52 IST2014-06-02T00:52:26+5:302014-06-02T00:52:26+5:30
गेली तीन ते चार दशके महापालिकेच्या सेवेत असलेल्या ११० वरिष्ठ अधिकार्यांपासून ते चतुर्थ कर्मचारी पहिल्यांदाच ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले
_ns.jpg)
पालिकेतील ११० कर्मचारी एकावेळी सेवानिवृत्त
पुणे : गेली तीन ते चार दशके महापालिकेच्या सेवेत असलेल्या ११० वरिष्ठ अधिकार्यांपासून ते चतुर्थ कर्मचारी पहिल्यांदाच ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. ज्येष्ठ कर्मचार्यांच्या कृतज्ञता सोहळ््याला पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार उपस्थित होता. त्यामुळे महापालिकेचे आवार एका कौटुंबिक वातावरणाने शनिवारी गहिवरले होते. महापालिकेच्या स्थापनेला जवळजवळ ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या काळात महापालिकेतील अनेक महापौर, पदाधिकारी व आयुक्त बदलले. मात्र, अनेक वर्षांपासून महापालिकेच्या विविध विभागांतून पुणेकरांची मनोभावे सेवा करणारी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच सेवानिवृत्त झाली. त्यामुळे उपमहापौर बंडू गायकवाड, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला. महापौर कार्यालयाचे जमादार रामचंद्र दोंत्रामणी, लेखनिक पोपट अडसूळ, मोटार सारथी बाळू टिळेकर, सेवक विलास भोसले, मिस्त्री विजय शिंदे आदी कुटुंबीयांसह उपस्थित होते. त्या वेळी सेवानिवृत्त सेवक कुटुंबीयांना आपण काम करीत असलेले कार्यालय दाखविणे, प्रमुखांना भेटणे व महापालिकेच्या हिरवळीवर फोटो काढत होते. (प्रतिनिधी)