ओतूर परिसरातील ४ गावांत ११ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST2021-07-11T04:09:56+5:302021-07-11T04:09:56+5:30
शनिवारी ओतूर शहरात ७ उदापूर २, ठिकेकरवाडी व मांदारणे येथे एक, एक, रुग्ण असे ११ नवीन रुग्ण सापडले ...

ओतूर परिसरातील ४ गावांत ११ नवीन रुग्ण
शनिवारी ओतूर शहरात ७ उदापूर २, ठिकेकरवाडी व मांदारणे येथे एक, एक, रुग्ण असे ११ नवीन रुग्ण सापडले आहेत, असे डॉ. यादव शेखरे यांनी सांगितले .
ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार १६८ झाली आहे. या पैकी १ हजार ९६ बरे झाले आहेत. २० जण कोविड सेंटर तर १२ जण घरीच उपचार घेत आहेत. ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उदापूर येथील बाधितांची संख्या २३७ झाली आहे. यापैकी २०० बरे झाले आहेत. २४ जण कोविड सेंटर तर ३ जण घरीच उपचार घेत आहेत. १० जणांचा मृत्यू झाला आहे.
मांदारणे येथील १७ बाधितांपैकी १४ बरे झाले आहेत, ३ जण उपचार घेत आहेत, असे डॉ. सारोक्ते व डॉ. शेखरे यांनी सांगितले.