‘तुळशीबागे’कडून अयोध्येतील राममंदिरासाठी ११ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:57+5:302021-02-05T05:16:57+5:30

पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी पुण्यातील पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरातर्फे ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. श्री रामजी संस्थान ...

11 lakhs for 'Ram Mandir' in Ayodhya from 'Tulshibage' | ‘तुळशीबागे’कडून अयोध्येतील राममंदिरासाठी ११ लाख

‘तुळशीबागे’कडून अयोध्येतील राममंदिरासाठी ११ लाख

पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी पुण्यातील पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरातर्फे ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. श्री रामजी संस्थान तुळशीबागतर्फे तुळशीबाग राममंदिरात आयोजित कार्यक्रमाला संत तुकाराम महाराजांचे वंशज, पेशव्यांचे वंशज यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी व स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

श्री रामजी संस्थान तुळशीबागच्यावतीने ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे, पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे, रा. स्व. संघाचे प्रशांत यादव, अ‍ॅड. शरद चंद्रचूड, नगरसेवक हेमंत रासने, अ‍ॅड. गायत्री खडके, तुळशीबाग मंदिराचे विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले आदी यावेळी उपस्थित होते.

उदयसिंह पेशवे म्हणाले की, नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून तुळशीबागवाले यांचे पुण्याच्या विविध विकासकामात योगदान आहे. अयोध्येतील राममंदिरासाठी दिलेली देणगी ही स्पृहणीय गोष्ट आहे. आजच्या काळात मंदिरे सांभाळणे कठीण झाले आहे. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार व्हायला हवा. निधीअभावी मंदिरे पडत आहेत. त्यामुळे पुण्यातील अशा मंदिरांकडे देखील सर्वांनी लक्ष द्यायला हवे.

शिवाजीमहाराज मोरे म्हणाले की, प्रभू श्रीरामांचे चरित्र व अवतारकार्य भारतीयांसाठी आदर्श, अनुकरणीय व वंदनीय आहे. भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हाच मंदिरांचे पुनर्निमाण व्हायला हवे होते. पण त्यावेळच्या प्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे हे झाले नाही. त्यामुळे आता ‘राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ अशी वाटचाल आपल्याला करायची आहे. त्यासाठी तुळशीबाग राममंदिरासारख्या संस्थांनांसोबतच सामान्यांचा सहभागही महत्वाचा आहे. प्रशांत यादव यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी स्वागत केले. किशोर येनपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: 11 lakhs for 'Ram Mandir' in Ayodhya from 'Tulshibage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.