श्री छत्रपती स्वाभिमानी पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:50+5:302021-07-20T04:09:50+5:30

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तानाजीराव शिंदे होते. सभेसाठी व्हाइस चेअरमन सुमन आगलावे, संस्थेचे व्यवस्थापक भागवतराव घुले यांच्यासह ...

11% dividend of Shri Chhatrapati Swabhimani Patsanstha | श्री छत्रपती स्वाभिमानी पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश

श्री छत्रपती स्वाभिमानी पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तानाजीराव शिंदे होते. सभेसाठी व्हाइस चेअरमन सुमन आगलावे, संस्थेचे व्यवस्थापक भागवतराव घुले यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन तानाजी शिंदे यांनी ऑनलाईन सभेत सहभागी झालेल्या सभासदांचे व सहकारी संचालकांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सभासदांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्पक पद्धतीने दिली गेली. अध्यक्षांनी दिलेली उत्तरे ऐकून सभासदांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. शेवटी अध्यक्षांनी या वर्षी ११ टक्के लाभांश जाहीर करून सभासदांना सुखद असा धक्का दिला. अगोदरच सभासदांच्या बॅंक खात्यात अ‍ॅडव्हान्स म्हणून १० टक्के लाभांश जमा केलेला आहे. उर्वरीत १ टक्का डिव्हिडंड दोन दिवसांत सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे, शिंदे यांनी सांगितले. सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रामचंद्र शिंगाडे यांनी केले. आभार संचालक गुणवंत वाघमोडे यांनी मानले.

Web Title: 11% dividend of Shri Chhatrapati Swabhimani Patsanstha