‘एचए’साठी ११ कोटी मंजूर
By Admin | Updated: April 24, 2015 03:35 IST2015-04-24T03:35:11+5:302015-04-24T03:35:11+5:30
येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांच्या थकीत वेतन आणि देणे अदा करण्यासाठीचा ११ कोटी रुपये देण्याचा प्रस्तावास मंजुरी

‘एचए’साठी ११ कोटी मंजूर
पिंपरी : येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांच्या थकीत वेतन आणि देणे अदा करण्यासाठीचा ११ कोटी रुपये देण्याचा प्रस्तावास मंजुरी
दिल्याचे केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंत कुमार यांनी लोकसभेत
गुुरुवारी सांगितले, अशी माहिती कामगार संघटनेचे सचिव सुनील पाटसकर यांनी दिली. कंपनीच्या कामगारांचे गेल्या १० महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही. त्यामुळे कामगारांनी कंपनी प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन केले होते.
या प्रश्नासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. आणि या विषयास पाठिंबा देणाऱ्या २ ते ३ खासदारांचा अनंत कुमार यांनी आवर्जून उल्लेख केला. अनंत कुमार यांनी ११
कोटींची रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या ३ महिन्यांचे कामगारांचे
वेतन आणि वीज, पाण्याचे थकीत देय अदा करण्यासाठी हा निधी असणार आहे. तसेच, कंपनीचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.
दरम्यान, ११ कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव ३ ते ४ महिन्यांपासून प्रलंबित होता. निर्णय झाल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण आहे, असे पाटसकर म्हणाले.(प्रतिनिधी)