शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा वाढदिवस करण्यासाठी गेलेल्या दहावीतील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 13:15 IST

दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला

धनकवडी : सेल्फीच्या नादात पुरंदर तालुक्यातील पाथरवाडी येथील पाझर तलावांमध्ये एक तरुण बुडाल्याची घटना, मंगळवारी सायंकाळी घडली, कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राला जवानांनी रात्री साडेअकरा वाजता लाईफ रिंगच्या साह्याने मुलाला बाहेर काढला. अनिश तानाजी खेडेकर (वय १५ वर्षे) राहणार संभाजी नगर, तीन हत्ती चौक, धनकवडी, असे मृत मुलाचे नाव आहे. पुरंदर तालुक्यातील पाथरवाडी येथील तलावामध्ये एक तरुण बुडाल्याची माहिती पोलीस पाटील सचिन दळवी याने सासवड पोलिसांना दिली. सासवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध सुरू केला. 

दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला. स्थानिक नागरिक व पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. दरम्यान कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राला रात्री दहा वाजता मुलगा पाण्यात बुडाल्याची खबर मिळाली. अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली व ११. ३० वाजता लाईफ रिंगच्या साह्याने मुलाला बाहेर काढला. यामधे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहनचालक रविंद्र हिवरकर, जवान दशरथ माळवदकर, संदिप पवार, औंकार ताटे व गोविंद गित्ते यांनी सहभाग घेतला.

अनिश खेडेकर संभाजीनगर येथे राहत होता. तो सहकारनगर येथील विद्या निकेतन शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील तानाजी खेडेकर रिक्षा चालक असून आई गृहिणी आहे. त्या दोन भाऊ आहे. अनिश च्या अकाली मृत्यूने संभाजीनगर मध्ये शोककुळा पसरली असून आईवडीलांना शोक अनावर झाला होता.

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDhankawadiधनकवडी