Corona Virus News: पुणे शहरात सोमवारी वाढले १०८२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 09:12 PM2021-03-15T21:12:28+5:302021-03-15T21:13:05+5:30

६७८ रुग्ण झाले बरे : १० रुग्णांचा मृत्यू

1082 patients increased in Pune city on Monday | Corona Virus News: पुणे शहरात सोमवारी वाढले १०८२ रुग्ण

Corona Virus News: पुणे शहरात सोमवारी वाढले १०८२ रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७० जणांची प्रकृती चिंताजनक

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सोमवारी दिवसभरात १०८२ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ६७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार ९८४ झाली आहे.   

 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ७७६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९६२ झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 दिवसभरात एकूण ६७८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख २ हजार ३३९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख १९ हजार २८५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ९८४ झाली आहे.   

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार २६६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ५५ हजार ६५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.


 

Web Title: 1082 patients increased in Pune city on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.