शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पुण्यातील केसरीवाड्यात 'लोकमान्य टिळकांचा' १०२ वर्षांपूर्वींचा पूर्णाकृती पुतळा विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 19:15 IST

मुंबईत १९१९ मध्ये साक्षात लोकमान्यांना समोर बसून झाली पुतळ्याची निर्मित्ती

ठळक मुद्देमूर्तिकार केशव लेले यांनी हा प्लँस्टर ऑफ पँरिसचा पुतळा केला साकार ८० वर्षे हा पुतळा दादर येथे त्यांचे पुत्र यशवंत लेले यांच्या निवासस्थानी होता

पुणे : लोकमान्य टिळकांची जयंती आणि गुरूपोर्णिमा असा योग साधत साक्षात टिळकांसमोर बसून तयार केलेला त्यांचा पूणार्कृती पुतळा केसरीवाड्यातील टिळक अभ्यासिकेत शुक्रवारी विराजमान झाला. आरामखुर्चीत बसलेला आणि हातात वर्तमानपत्र घेतलेल्या अविर्भावातील हा पुतळा पाहिल्यानंतर साक्षात टिळकच बसल्याचा भास होतो. इतका हुबेहुब हा पुतळा साकार करण्यात आला आहे. मुुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार कै. केशव लेले यांनी १०२ वषार्पूर्वी म्हणजे १९१९ मध्ये हा पुतळा साकार केला होता, हे त्यातील विशेष!

या पूर्णाकृती पुतळ्याविषयी आमदार मुक्ता टिळक, शैलेश टिळक, शिल्पकार केशव लेले यांचे चिरंजीव यशवंतराव लेले, त्यांची कन्या डॉ. चित्रा लेले, शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी कुणाल टिळक आणि चैत्राली टिळक आदी उपस्थित होते.

हा पुतळा साधासुधा नाही तर जुलै १९१९ मध्ये मुंबईतील सरदार भवन येथे साक्षात लोकमान्य टिळकांच्या समोर बसून बनवलेला त्यांचा एकमेव पूृर्णाकृती पुतळा आहे.  मूर्तिकार केशव लेले यांनी हा प्लँस्टर ऑफ पँरिसचा पुतळा साकार केला आहे. पुढील ८० वर्षे तो दादर येथे त्यांचे पुत्र यशवंत लेले यांच्या निवासस्थानी  होता.  त्यानंतर १९१९ मध्ये पुण्यातील महात्मा सोसायटी येथे वास्तव्य करणारी त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी पुतळा हलविण्यात आला होता. तो चांगल्या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी लेले कुटुंबियांची इच्छा होती, तेव्हा लोकमान्यांचे निवासस्थानअसलेल्या वास्तुचे नूतनीकरण होईल तेव्हा हा पुतळा तेथे स्थापित करू असे त्यांना सांगितले होते. आज गुरूपौर्णिमा आणि टिळक जयंतीच्या दिवशी पुणार्कृती पुतळा अभ्यासिकेत विराजमान झाला आहे. आम्ही लेले कुटुंबियांचे ऋणी असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले.

हा पुतळा पुणे शहराची शान

लोकमान्य टिळक हे आजवर त्यांच्या फोटोच्या स्वरूपात सगळ्यांसमोर होते. मात्र, ते हयात असताना त्यांना समोर बसवून प्रत्यक्षात साकारलेला हा पुतळा असल्याने त्याचे जास्त महत्व आहे. लोकमान्य टिळकांचे फोटो काढणे तत्कालीन  छायाचित्रकारांसाठी आव्हानात्मक होते. त्यात शिल्पकारासाठी पुतळा साकारणे ही तर कसोटीच होती. लेले कुटुंबियांनी पुतळा जपला आणि त्यांच्या मार्फत आज तो टिळकांच्या निवासस्थानी बसविला. हा पुतळा म्हणजेपुणे शहराची शान आहे. असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकMukta Tilakमुक्ता टिळकMumbaiमुंबई