शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जवानांसाठी आपुलकीचा गोड ठेवा!; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार : १०० किलो तिळगूळ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:19 IST

देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला.

ठळक मुद्देजातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट : गायत्री खडकेते सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत : हेमंतराजे मावळे

पुणे : स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला. ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत तिळगुळाचे पूजन करण्यात आले. या उपक्रमात २५ मंडळांनी सहभाग होत आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करून दिली. शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, शाहीर हेमंतराजे मावळे, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, वीरपत्नी दीपाली मोरे, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह राजपूत उपस्थित होते. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे, संयुक्त प्रसाद मित्रमंडळ, नेने घाट गणेशोत्सव मंडळ, कडबे आळी गणेशोत्सव मंडळ, हसबनीस बखळ मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ आणि इतर सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. गायत्री खडके म्हणाल्या, की सध्या जातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांनी कधीही जातपात मानली नाही. आपल्या देशात जातींवरून भांडणे होत असल्याचे कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटेल. सैनिकांना तिळगूळ पाठवताना ‘आम्ही जातपात न मानता भारतीय म्हणून एकजुटीने राहू,’ असा विश्वास देणे गरजेचे आहे.बिपीन पाटोळे म्हणाले, ‘सैनिकांप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. तिळगुळाचा प्रसाद सैनिकांसाठी लाखमोलाचा आहे.’ शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, ‘आपण सैनिकांना तिळगूळ पाठवतो, आजूबाजूच्या लोकांनाही ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच देशात धर्मासाठी, जातीसाठी लढत असू तर सैनिकांच्या लढ्याचा काहीच फायदा होणार नाही. ते देशाच्या सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत.’ गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे, नितीन पंडित, अजित परांजपे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे