शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

१00 स्त्रिया, १00 मिनिटे आणि १०० टक्के; ‘स्टेटस : बाईमाणूस’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 11:51 AM

स्त्रीभ्रूणहत्या, महिला असुरक्षितता, कास्टिंग काऊच अशा विविध विषयांचे प्रतिबिंब या प्रयोगामध्ये उमटणार

ठळक मुद्देआगळा वेगळा प्रयोग : महिलांच्या अनादीकाळापासूनच्या व्यथांचे चित्रणएकही महिला धर्म संस्थापक नाही, पण तिच्यावर जाती-धर्माची बंधने

पुणे : रंगभूमी म्हणजे प्रायोगिक कलाविष्काराचे व्यासपीठ. आजवर रंगमंचावर ‘न भूतो न भविष्यती’ असे अनेक प्रयोग सादर झाले आहेत. आता पुन्हा एका नव्या  ‘प्रयोगासाठी रंगमंच सज्ज झाला आहे. ‘१०० स्त्रिया, १०० मिनिटे आणि १०० टक्के सत्य सांगणारा एक आगळावेगळा अविष्कार आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त रसिकांसमोर सादर होणार आहे. जुन्या काळातील महिलांनी केलेल्या संघर्षापासून  स्त्रीभ्रूणहत्या, महिला असुरक्षितता, कास्टिंग काऊच अशा विविध विषयांचे प्रतिबिंब या प्रयोगामध्ये उमटणार आहे. या प्रयोगाचे नाव आहे  ‘स्टेटस : बाईमाणूस’!येत्या ७ मार्च रोजी भरत नाट्यमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता हा रंगाविष्कार अनुभवता येणार आहे. ही एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन विनिता पिंपळखरे रसिकांसमोर येत आहेत. लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी पार पडत तब्बल १०० महिलांना रंगमंचावर आणण्याचे शिवधनुष्य पिंपळखरे यांनी पेलले आहे. या संकल्पनेविषयी विनिता पिंपळखरे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. त्या म्हणाल्या, स्त्रीकडे नेहमी  ‘बाई’ म्हणूनच पाहिले जाते.  ‘माणूस’ म्हणून तिची दखलच घेतली जात नाही.  या प्रयोगामध्ये वेगवेगळी स्क्रिप्टस तयार केली आहेत. प्रसिद्ध कवी उदा:  ‘बालकवी’ (केशव त्रिंबक ठोंबरे) ज्यांनी ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ सारखी निसर्ग कविता लिहिली. पण पत्नी पार्वती ठोंबरे यांना बोराच्या झाडीच्या काट्याने ते मारायचे. डॉ. विश्राम घोले या समाजसुधारकाच्या काशीबाई मुलीला शिक्षणासाठी बाहेर पडल्यामुळे समाजातील काही व्यक्तींनी मारून टाकले, रमाबाई रानडे यांनादेखील संघर्ष करावा लागला. या माध्यमातून जुन्या काळातील महिलांचा आयुष्यपट मांडला आहे. तर दुसरीकडे काही सत्यघटनेवर आधारित कहाण्या महिला सांगत आहेत. जुन्या काळापासून आधुनिक युगापर्यंतच्या महिलांनी केलेल्या संघर्षाची गाथा उलगडली जाणार आहे. १०० टक्के सत्य, १०० मिनिटे, १०० महिलांच्या माध्यमातून मांडत आहे. प्रयोगात  सहभागी झालेल्या अनेक महिलांनी पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवले आहे. ही संकल्पना अनेकांना आवडली. या प्रयोगातून काही टोचणारे निष्कर्षही काढले आहेत. ...........बाईकडे माणूस म्हणून पाहणे गरजेचेएकही महिला धर्म संस्थापक नाही, पण तिच्यावर जाती-धर्माची बंधने घातली जातात. महिला पुढे येऊन एकेक वाक्यात हे निष्कर्ष सांगणार आहेत. हा प्रयोग समाजमनाला नक्कीच विचार करायला लावणारा असून, यामुळे एका ‘बाई’कडे ‘माणूस’ म्हणून बघण्याचा प्रवास सुरू होईल, अशी आशा करायला हरकत नाही.  

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकWomenमहिला