खानापूर आरोग्य केंद्रामार्फत १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:18+5:302021-02-05T05:06:18+5:30

सिंहगड परिसरात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती, अशी माहिती खानापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी ...

100% vaccination through Khanapur Health Center | खानापूर आरोग्य केंद्रामार्फत १०० टक्के लसीकरण

खानापूर आरोग्य केंद्रामार्फत १०० टक्के लसीकरण

सिंहगड परिसरात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती, अशी माहिती खानापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. आश्विनी पाटील यांनी दिली. पल्स पोलिओ मोहिमेत बालकांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी १५ बूथ स्थापन करण्यात आले होते. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत कर्मचारी बालकांना डोस पाजले. १५ बूथ, १ ट्रान्झिट युनिट व २ मोबाईल टीम असे एकूण १८ बूथ कार्यरत करण्यात आले होते. मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी कर्मचारी अशी ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत करण्यात आली होती. रविवारी डोस न घेतलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान डोस देण्यात येणार आहे. या काळात घरोघरी, वाडीवस्ती, वीटभट्टी, ऊसतोड टोळींतील बालकांचा शोध घेण्यात येणार आहे, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी पालकांना सागितले. सर्व पालकांनी आपल्या घरातील व शेजारील बालकांना केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस पाजला.

खानापूर केंद्रामार्फत या गावातील व वाड्यावस्त्यावर जाऊन बालकांना डोस देण्यात आले.

गोळेवाडी, सिंहगड किल्ला, सिंहगड टोलनाका, डोणजे, गोऱ्हे खु, खानापूर, मणेरवाडी, खामगाव मावळ, अतकरवाडी, सांबरेवाडी, मोगरवाडी, खरमरी, मालखेड, वरदाडे, सोनापूर, आंबी.

फोटो लाईन - मालखेड गावात माजी उपसभापती किसनबाप्पू जोरी यांच्या हस्ते बालकाला पोलीओ डोस पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

Web Title: 100% vaccination through Khanapur Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.