शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

' त्या ' दिव्यांग बालकाला मिळाला शंभर टक्के न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 07:00 IST

दुर्मिळ आजारामुळे झालेल्या अपंगत्वाचे केले होते ५४ टक्के निदान

ठळक मुद्देलोकमत प्रभाव : कारवाई करण्याचे आश्वासन 

विशाल शिर्के -

पुणे :आठ वर्षांच्या मुलाला झालेल्या अतिदुर्मिळ आजारामुळे दोन्ही हात आणि पायाची बोटे जोडलेली... दोन्ही पाय गुडग्यापासून मागे मांडीला चिकटली. त्यावर करावी लागलेली शस्त्रक्रिया.. त्वचेला हात लावली तरी फाटेल अशी स्थिती....कायम जखमा वावरत असलेले शरीर...अशी गंभीर स्थिती असताना देखील औंध रुग्णालयाने त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ५४ टक्के अपंगत्व असल्याची नोंद केल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. त्यानंतर प्रहार संघटनेने आंदोलनही केले. अखेरीस रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाची पुन्हा तपासणी करीत ८० टक्के अपंगत्व असल्याचे सुधारित प्रमाणपत्र दिले असून, पूर्वी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. हर्षल मंगेश कदम (वय ८, रा. रामदासनगर, चिखली) या मुलाला दुर्मिळ एपिडर्मोलिसिस बुलोसा हा जन्मजात आजार झाला आहे. त्याची हाता पायाची बोटे चिकटली असून, हात आणि पाय अगदी काडीसारखे आहेत. त्याला प्रत्यक्ष पाहणेही सामान्य माणसाला असह्य करणारे आहे. साध्या डोळ््यांनी त्याची विदारक स्थिती दिसत असानाही या मुलाला अवघे ५४ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. संबंधित प्रमाणपत्र ३ जानेवारी २०१८ला दिले होते. त्यावर डॉ. एस. व्ही. खिलारे, अतिरिक्त सिव्हील सर्जन आणि सिव्हील सर्जन डॉ. आर.के. शेळके यांची स्वाक्षरी होती. 

दिव्यांग दिनादिवशी (दि. ३) ‘लोकमत’ने ‘जीव टांगणीला, तरी म्हणे ५४ टक्के अपंगत्व’ या मथळ््याखाली वृत्ताला वाचा फोडली होती. त्यानंतर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रमेश पिसे, रामचंद्र तांबे, विद्या तांदळे यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक दिव्यांगांनी आंदोलन केले. ‘दिव्यांगांनी केलेल्या आंदोलनानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने त्वचारोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केले. त्यांनी तपासणी करुन संबंधित बालकाला बहुविकलांगत्व असल्याचे निदान केले. त्यानुसार हर्षल याला ८० टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच, केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाºया युनिक डिसअ‍ॅबिलिटी आयडीचेही वितरण केल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. ............हर्षलला चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन औंध रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल. -राजेंद्र वाकचौरे, पिंपरी-चिंचवड, प्रहार अपंग क्रांती आंदोलन   

टॅग्स :PuneपुणेAundhऔंधhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार