तळेगाव ढमढेरेत १०० बेडचे कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:10 IST2021-04-21T04:10:37+5:302021-04-21T04:10:37+5:30
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सोळा गावांचा समावेश असून, सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रुग्णांना तातडीने ...

तळेगाव ढमढेरेत १०० बेडचे कोविड केअर सेंटर
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सोळा गावांचा समावेश असून, सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी त्वरित कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांच्याकडे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे,अनिल भुजबळ,संचालक सुदीप गुंदेचा, सरपंच अंकिता भुजबळ,उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांनी केली होती. नुकतेच आमदार अशोक पवार, उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी कोविड सेंटरसाठी जागेची पाहणी करुन कोविड केअर सेंटर सुरू करण्याविषयी चर्चा करून ते सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला.