शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणे सिझेरियन करणे दोन डॉक्टरांना भोवले; न्यायालयाने सुनावली १० वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 14:40 IST

न्यायालयाने डॉक्टरांना १० वर्षाची सुनावली शिक्षा ; प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावला..

ठळक मुद्देयाप्रकरणी महिलेचे पती अनिल जगताप यांनी देहुरोड पोलिसांकडे दिली होती फिर्याद

पुणे : प्रसुती प्रक्रियेत तज्ञ व सिझेरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नसतानाही महिलेची प्रसुती करीत तिच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या दोन डॉक्टरांना न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.  दोघा डॉक्टरांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.  आर. जगदाळे यांनी ही शिक्षा सुनावली. या घटनेत राजश्री अनिल जगताप (वय २२) या विवाहितेचा मृत्यु झाला होता. त्यांनी जन्म दिलेली मुलगी सुरक्षित आहे.  डॉ. जितेंद्र शिंपी (वय ४०) आणि सचिन हरी देशपांडे (वय ३९) अशी शिक्षा झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. तर भूल तज्ञ डॉ. विजय अगरवाल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.याप्रकरणी राजश्री यांचे पती अनिल जगताप यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. डॉ. शिंपी यांचे किवळे परिसरात अथश्री रुग्णालय आहे. डॉ. सचिन देशपांडे हे तेथे काम करत होते. दोघांचे बीएएमएस शिक्षण झाले असून ते सिझरियन ऑपरेशन करण्यास सक्षम नाहीत. ३० एप्रिल २०१२ रोजी डॉ. शिंपी यांच्या रुग्णालयात राजश्री यांना दाखल करण्यात आले होते. सीझर करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे राजश्री यांची तब्येत बिघडली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या काळात मोठा रक्तस्त्राव झाल्याने राजश्री यांचा मृत्यु झाला. डॉक्टर प्रसुती प्रक्रियेत तज्ञ व सिझेरियन आपॅरेशन करण्यास सक्षम नसताना त्यांनी निष्काळजीपणे ऑपरेशन केल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या खटल्यात सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले. या संवेदनशील खटल्यात सरकारी वकील कावेडिया यांचे न्यायालयाने विशेष कौतुक केले़ असे वकील न्यायालयाची संपत्ती आहेत, असे निकाल देताना म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाDeathमृत्यूCourtन्यायालय