दहावीतील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:19+5:302021-02-21T04:20:19+5:30

विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा निकाल दिला. प्रीतेश रेवणसिद्ध चौधरी (वय ३१, रा. निगडी) असे त्याचे नाव ...

10 years hard labor for raping 10th class girl | दहावीतील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी

दहावीतील मुलीवर बलात्कार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी

विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा निकाल दिला. प्रीतेश रेवणसिद्ध चौधरी (वय ३१, रा. निगडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडित १५ वर्षीय मुलीच्या आईने हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. नोव्हेंबर 2016 आणि 24 डिसेंबर 2015 दरम्यान ही घटना घडली. पीडित मुलगी दहावीत शिकत होती. ती एका संस्थेत करिअर मार्गदर्शन क्‍लासला जात होती. तिथल्या मार्गदर्शकाने तिच्या कुटुंबीयांचीही ओळख वाढवली होती. बदनामी करण्याच्या अमिषाने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील संजय पवार यांनी केली. त्यानुसार बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भादंवि कलम 506 नुसार न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.

Web Title: 10 years hard labor for raping 10th class girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.