शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 21:23 IST

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहे

पाटेठाण : राहू (ता.दौंड) येथे सोमवार (दि.२७) रोजी पासून मोकाट पिसाळलेल्या अवस्थेत फिरत असलेल्या कुत्र्याने आज मंगळवारी रात्रीच्या सुमारास हिंसक रुप धारण केले असून गावठाण तसेच महात्मा फुले चौक, समतानगर परिसरात रस्त्यावरुन चालणाऱ्या दहा ते बारा नागरिकांना चावा घेत धुमाकूळ घातला आहे.

मंगळवार (दि.२८) रोजी सांयकाळी साडेसातच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा ते बारा लोकांवर इंजेक्शन देऊन प्रथमोपचार करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पांढरे यांनी दिली आहे. याचबरोबर राहूच्या सिनर्जी हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, चैतन्य हॉस्पिटल येथेही पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या काही लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही जखमींना ससून येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे अवाहन सरपंच दिलीप देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडSocialसामाजिकdogकुत्राhospitalहॉस्पिटलsasoon hospitalससून हॉस्पिटल