भोर तालुक्यातील ७३ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:32+5:302021-01-08T04:31:32+5:30
उमेदवारांनी माघार घेतल्याने ५६७ जागांसाठी ७७० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर चिखलगाव, नेरे, महुडेबुदुक नांद, आळंदे, ...

भोर तालुक्यातील ७३ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध
उमेदवारांनी माघार घेतल्याने ५६७ जागांसाठी ७७० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर चिखलगाव, नेरे, महुडेबुदुक
नांद, आळंदे, आळंदेवाडी, कापूरव्होळ, कासुर्डी खे.बा, पान्हवळ सावरदरे या दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, भोर तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, माघारीनंतर १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६३ गावच्या निवडणुका लागल्या आहेत.
तालुक्यात २२२ प्रभागांपैकी ५६ प्रभाग बिनविरोध झाले असून, त्यातील १९१ सदस्य बिनविरोध, तर १६६ प्रभागांची निवडणूक लागली आहे. एकूण ८००५४ मतदार असून, यात ३९०९३ मतदार महिला, तर ४०९६१ मतदार पुरुष आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण पुन्हा नव्याने पडणार असून सदस्यांमधून सरपंचांची निवड केली जाणार आहे. मात्र अनेक इच्छुकांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे विविध पक्ष निवडणुकीत उतरल्याने गावागावांत चुरस वाढली आहे.
भोर तालुक्यातील ७३ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६३ ग्रामपंचायतींची निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचू लागली असून मतमोजणीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत होणार असल्यामुळे सरपंचपदाचे प्रमुख दावेदार आता आपल्या पत्नीला निवडणूक रिगंणात आणून लढतीत रंगत भरली आहे, तर अनेक गावात तेच तेच सदस्य आग्रही राहून इतरांना संधी देत नसल्याने अनेक गावात बिनविरोध जागा होण्यासाठी खुर्चीला चिकटलेले सदस्य मात्र हटवादीपणा करू लागल्याने आता तरुणवर्ग पेटून निवडणूक रिंगणात उतरला आहे. दहा पंधरा वर्षे सदस्यपदी राहूनही सरपंचपदाची माळ गळ्यात पडत नसल्याने जुनेजाणते सदस्य मात्र पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे तालुक्यात अनेक गावे बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून प्रयत्न केले त्याला यश आले आहे. मात्र एखाद्या प्रभागात एकच जागा असल्याने खुल्या गटातून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बिनविरोध ग्रामपंचायत होण्यात विरोध होऊन निवडणुका लागल्या आहेत