ओतूर परिसरात १० नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST2021-06-19T04:08:27+5:302021-06-19T04:08:27+5:30

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील १९ गावांपैकी ६ गावांत १० नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या २ ...

10 new patients in Ootur area | ओतूर परिसरात १० नवीन रुग्ण

ओतूर परिसरात १० नवीन रुग्ण

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील १९ गावांपैकी ६ गावांत १० नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ४४८ झाली आहे. पैकी २ हजार २४९ बरे झाले आहेत. ७९ जण कोविड सेंटर तर २५ जण घरीच उपचार घेत आहेत. ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. यादव शेखरे यांनी डॉ. सारोक्ते यांच्यावतीने दिली.

शुक्रवारी डिंगोरे २, धोलवड १, ओतूर २, उदापूर ३, डुंबरवाडी १, हिवरेखुर्द खूर्द १ असे १० नवीन रुग्ण सापडले आहेत.

गुरुवारी ६ गावांत २२ नवीन रुग्ण सापडले होते. त्यात ओतूर शहरात ११, धोलवड ४, मांदारणे ३, हिवरे खुर्द २, डिंगोरे, उदापूर एक एक रुग्ण होते. काही गावात दररोजच नवीन रुग्ण सापडत आहेत. असे आरोग्य अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले.

ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार ८५ झाली आहे. ९९८ बरे झाले आहेत. ३० कोविड सेंटर १९ घरीच उपचार घेत आहेत. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 10 new patients in Ootur area