ओतूर परिसरात कोरोनाचे १० नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:42+5:302021-06-22T04:08:42+5:30

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील १९ गावांपैकी सोमवारी ओतूर शहरात ६, उदापूर ३, तेजेवाडी १ असे १० नवीन रुग्ण ...

10 new corona patients in Ootor area | ओतूर परिसरात कोरोनाचे १० नवीन रुग्ण

ओतूर परिसरात कोरोनाचे १० नवीन रुग्ण

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेतील १९ गावांपैकी सोमवारी ओतूर शहरात ६, उदापूर ३, तेजेवाडी १ असे १० नवीन रुग्ण सापडल्याने परिसरातील बाधितांची संख्या २ हजार ४७८ झाली आहे. २ हजार २६७ बरे झाले आहेत, २८ कोविड सेंटर, तर २४ जण घरीच उपचार घेत आहे, ९९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

ओतूर शहरात रविवारी १ रुग्ण होता, सोमवारी ६ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या अकराशे झाली आहे. त्यातील १ हजार १० बरे झाले आहेत, २८ जण कोविड सेंटर, तर २४ जण घरीच उपचार घेत आहेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 10 new corona patients in Ootor area