शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साडेदहा लाख वीज मीटर नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:45 IST

अचूक बिलींगसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसंजीव कुमार : सदोष वीज मीटर महिनाभरात बदलणारग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास

पुणे : राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर नादुरुस्त आहेत. येत्या महिन्याभरात असे मीटर बदलून त्याची मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. राज्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आयोजित मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन) अभिजित देशपांडे, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्यासह प्रादेशिक व कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता यावेळी उपस्थित होते. संजीव कुमार म्हणाले, अचूक बिलींगसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंगल फेजचे ३० लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे वीजमीटर एक महिन्याच्या कालावधीत बदलण्यात यावेत. त्यानंतर नादुरुस्त असलेले सिंगल फेजचे एकही वीजमीटर ग्राहकाकडे राहणार नाहीत याची दक्षता घेऊन कार्यवाही करावी. तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार नादुरुस्त वीजमीटर त्वरीत बदलण्यात यावे अशी सूचनाही कुमार यांनी केली.महावितरणकडून मीटर रिडींग मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरु असल्याने बिलिंग प्रणालीत पारदर्शकता आली आहे. मात्र, मीटर रिडींग एजन्सीजकडून अद्यापही सदोष मीटर रिडींग घेण्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा त्रास होत आहे. मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणला नुकसान सोसावे लागत आहे. असे प्रकार टाळण्यासाठी व बिलींगमध्ये अचूकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक उपाययोजना कराव्यात असेही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कुमार यावेळी म्हणाले. महावितरणच्या राज्यातील १६ परिमंडलात नादुरुस्त आढळलेल्या १० लाख ३७ हजार सिंगल फेज वीजमीटरमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १ लाख ८५ हजार, नागपूर प्रादेशिक विभागात २ लाख आणि कोकण प्रादेशिक विभागातील ४ लाख ५३ हजार वीज मीटरचा समावेश आहे. तसेच पुणे प्रादेशिक विभागातील १ लाख ९८ हजार मीटर देखील नादुरुस्त आहेत. हे वीजमीटर बदलण्यासाठी येत्या महिन्याभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेelectricityवीजbillबिल