पाटस-जत रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:10 IST2021-04-06T04:10:51+5:302021-04-06T04:10:51+5:30

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी ...

10 crore fund for development of Patas-Jat road | पाटस-जत रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी

पाटस-जत रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी सततचा पाठपुरावा केल्याने त्यांच्या मागणीला यश आले आहे.

इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचा मानला गेलेला राज्य महामार्ग बारामती ते इंदापूर -अकलूज हा रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने व वाहतूक दळणवळण सुव्यवस्थित व्हावे, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रस्ते विकासासाठी केंद्रीय स्तरावर तसेच मंत्री नितिन गडकरी यांचे भेट घेऊन याविषयी सततचा पाठपुरावा केला होता.

इंदापूर तालुक्यातील रस्ते विकासाला यामुळे गती मिळणार असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

Web Title: 10 crore fund for development of Patas-Jat road