घरातून 1 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST2020-12-04T04:32:09+5:302020-12-04T04:32:09+5:30

पुणे : शंकर शेठ रस्त्यावरील रामकृष्ण अपार्टमेंटमधील एका सदनिकेतून रोख रक्कम व दागिने असा सुमारे 1 लाख 90 हजार ...

1 lakh 90 thousand was stolen from the house | घरातून 1 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास

घरातून 1 लाख 90 हजारांचा ऐवज लंपास

पुणे : शंकर शेठ रस्त्यावरील रामकृष्ण अपार्टमेंटमधील एका सदनिकेतून रोख रक्कम व दागिने असा सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकेत यादव (वय 20, रा. शंकरशेठ रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री फियार्दी यांचे बंधु घरात झोपलेले असताना त्यांच्याकडून घराचा दरवाजा उडला राहिला होता. या दरवाजातून चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरुमच्या कपाटातील रोख 50 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला.

--------------------------------

Web Title: 1 lakh 90 thousand was stolen from the house