शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजारांची रक्कम लंपास; शिक्रापूर पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:40 IST

पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत. 

ठळक मुद्देसागर शहाजी भोसले (वय २७) यांनी शिक्रापूर पोलिसांत दिली तक्रारकारमध्ये ठेवले होते १ लाख ८० हजार रुपये

शिक्रापूर : शिक्रापूर येथील पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या बाबत सागर शहाजी भोसले (वय २७ रा. कोंढपुरी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भोसले हे त्यांच्या जवळील कार (एम एच १४ बी एक्स २९३७) घेऊन कोंढपुरी वरून शिक्रापूर येथे कामानिमित्त येत असताना त्यांच्या कारमध्ये १ लाख ८० हजार रुपये त्यांनी ठेवले होते. शिक्रापूर येथील विद्युत वितरण कार्यालयात गाडी पार्क  करून ते गेले. तेथील काम उरकून ते पुन्हा आपल्या गाडी जवळ आले असताना त्यांना गाडीचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडा दिसला. आत पुढील डिकीत ठेवलेले पैसे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे, पोलीस नाईक योगेश नागरगोजे यांनी जाऊन गाडीची पाहणी केली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत. 

टॅग्स :theftचोरीPuneपुणे