शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला बंद हॉटेलमधून रोख रकमेसह १ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:28 IST

बंद हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून साहित्य व रोख रक्कम असा १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या आरोपावरून बापलेकांसह अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी (दि. १७) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर : बंद हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून साहित्य व रोख रक्कम असा १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या आरोपावरून बापलेकांसह अज्ञात आरोपींविरुद्ध मंगळवारी (दि. १७) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.भागवत शिंदे, राहुल शिंदे (दोघे रा. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गोविंद संजू शेरिगर (वय ६० वर्षे, रा. पिसेवाडा, खडकपुरा, इंदापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. दि. १७ आॅक्टोबर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शेरिगर हे गेल्या चाळीस वर्षांपासून इंदापूरला राहात आहेत. इंदापूर एसटी बसस्थानकासमोर मारुती मंदिर ट्रस्टच्या जागेत ट्रस्टला भाडे देऊन हॉटेल चालवत आहेत. त्यासाठी त्यांनी रीतसर हॉटेलचा परवाना, वीज व नगर परिषदेचे पाण्याचे कनेक्शन घेतलेले आहे, असे असताना भागवत शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे या दोघांनी २० ते २५ जण जमवून दि. १० डिसेंबर २०१६ रोजी फिर्यादीच्या हॉटेलच्या चहूबाजूने व वरून पत्र्याचे शेड उभारून हॉटेल बंद करून टाकले. फिर्यादी व त्याच्या पत्नीस हाकलून दिले. या संदर्भात पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. हॉटेल व्यवसाय चालू करता येत नसल्याने उपासमारीची वेळ आली.पोलीस खात्यातील वरिष्ठांकडे दाद मागून ही उपयोग झाला नाही. अखेरचा उपाय म्हणून फिर्यादीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या पार्श्वभूमीवर दि. १७ आॅक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला समजले की, त्याच दिवशी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी व इतरांनी हॉटेलला लावलेला पत्रा उचकटून हॉटेलमधील सामान व रोख रक्कम चोरून नेली आहे. त्यामुळे फिर्यादीने त्या ठिकाणी जाऊन खात्री करून घेतली असता, ७५ हजार रुपयांचे लाकडाचे सहा टेबल्स, दहा खुर्च्या, हॉटेलचे दोन शटर, आठ हजार रुपयांची स्वयंपाकाची भांडी, दहा हजार रुपयांचे लाकडी काऊंटर, त्यामधील पंधरा हजार रुपयांची रोकड, एक तोळे वजनाची तीस हजार रुपयांची सोन्याची अंगठी असे १ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज त्या ठिकाणी दिसून आला नाही. 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे