शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 21:30 IST

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती.

ठळक मुद्देग्राहकांच्या खात्यात झाले होते पैसे जमा

पुणे : कॉसमॉस बँकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या आॅनलाइन दरोड्याच्यावेळी  कॉसमॉस बँकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यापैकी काही जणांनी हॅकींग सुरू असतानाच पैसे काढले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघे जण आढळले़. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम परत मिळविली. कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तत्काळ विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. त्यानंतर पथकाने तत्काळ  पुणे, कोल्हापूर, मुंबई व इंदौर या शहरांमधील ज्या एटीएममधून पैसे काढले गेले आहे, त्यावर लक्ष केंद्रित केले. दरम्यान, पोलिसांनी बँकेच्या काही ग्राहकांच्या खात्याची तपासणी केली. त्यावेळी ११ ते १३ आॅगस्ट या कालावधीत काही जणांनी सातत्याने एटीएममधून पैसे काढल्याचे आढळले. त्यानुसार एसआयटी पथकातील व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरीक्षक राधिका फडके यांना तपासादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी काही बँकेच्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या खात्यामध्ये जादा पैसे जमा झाल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी पुण्यातील दोन जणांनी आपल्या खात्यामध्ये अचानक जादा पैसे जमा झाल्याचे सांगितले. तसेच हव्यासापोटी आपण पैसे काढल्याची कबुलीही दिली. हॅकींगवेळी बँकेचे ग्राहक असलेल्यांच्या पुण्यातील एकाच्या खात्यामध्ये ९० हजार, तर दुसऱ्याच्या खात्यातून २० हजार होते. दोघांकडूनही पैसे परत मिळविले असल्याची माहिती पायगुडे यांनी दिली. अशाप्रकारे कोल्हापूर व इतर शहरातील आणखी काही खातेदारांच्या खात्यात जादा पैसे जमा झाल्याची माहिती मिळत असून त्यांच्याकडून हे पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे़ 

टॅग्स :Puneपुणेbankबँकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस