शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त; सीटखाली लपवली होती सोन्याची पेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:10 IST

बुधवारी दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती....

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) तब्बल एक किलो (१०८८.३ ग्रॅम) चोवीस कॅरेट सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी (५ जून) रोजी करण्यात आली. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील पाईपमध्ये सोने लपवले होते. पोलिसांना आणि कस्टम विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर तपासणी केल्यानंतर आरोपीच्या सीटखाली हे सोने आढळले.

बुधवारी दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी आणि झाडाझडती केली. त्यावेळी वैयक्तिक झडतीत किंवा सामानाच्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे कस्टम विभागही काही काळ गोंधळून गेले होते. नेमके या प्रवाशाने सोने कुठे ठेवले असेल? हा प्रश्न पडला होता.

प्रवाशाचे वर्तन अतिशय संशयास्पद असल्याने त्याने विमानात काही लपवले आहे का, अशी विचारणा केली. त्याने दिलेल्या उत्तरांमुळे कस्टम विभागाचा संशय आणखी वाढला. त्यानंतर त्याच्या सीटसह विमानातील इतर काही जागा शोधण्यात आल्या. झडतीदरम्यान तो बसलेल्या सीटखाली पाईपमध्ये सोन्याच्या पेस्टचे पाकीट लपवून ठेवलेले आढळून आले. हे जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे होते. वजन १०८८ असून त्याची किंमत ७८ लाख १ हजार ४३ रुपये आहे. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpune airportपुणे विमानतळ