मंचर उपजिल्हा रुग्णालयसाठी 1 कोटी रुग्णवाहिका व सुसज्ज प्रसूतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:09 IST2021-04-26T04:09:44+5:302021-04-26T04:09:44+5:30
आंबेगाव-शिरूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता उपजिल्हा रुग्णालयात कोरोना साथरोग उपाययोजनेअंतर्गत सामग्री उपलब्ध करून देणेबाबत विनंती उपजिल्हा ...

मंचर उपजिल्हा रुग्णालयसाठी 1 कोटी रुग्णवाहिका व सुसज्ज प्रसूतिगृह
आंबेगाव-शिरूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता उपजिल्हा रुग्णालयात कोरोना साथरोग उपाययोजनेअंतर्गत सामग्री उपलब्ध करून देणेबाबत विनंती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी वळसे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन साठवणूक टँक, 6 व्हेंटिलेटर व बायपास मशीन यांचा समावेश आहे.तसेच ट्रामा केअर युनिटसाठी विविध साहित्य सामग्रीसाठी 21 लक्ष, तर मंचर या ठिकाणी कोरोना पेशंट असल्याने इतर उपचारासाठी घोडेगाव रुग्णालयात गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी 1 रुग्णवाहिका तर त्याठिकाणी सुसज्ज प्रसूतिगृह उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुक्यात मंचर व घोडेगाव येथील साहित्य सामग्रीसाठी वळसे पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले आहे.
कोरोना रोगाची सद्यस्थिती लक्षात घेता अजूनही व्हेंटिलेटर व इतर साहित्याची आवश्यकता आहे. दानशूर व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केले आहे.