शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोड करणाऱ्या १९२ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 00:59 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड करणा-या तसेच पोलिसांवर दगडफेक करणा-या १९२ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड करणा-या तसेच पोलिसांवर दगडफेक करणा-या १९२ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. त्यापैकी एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अटक आरोपींपैकी ५८ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. काहींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाºया आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक झाली. तर डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी पीएमपी बस तसेच काहीदुकानांवर दगडफेक केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून १९२ जणांना अटक करण्यात आली.वारजे पोलिसांनी अटक केलेल्या ३० जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या २१ जणांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या ५५ जणांपैकी, ५० जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाच जणांनी त्यांना मारहाण झाल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. चांदनी चौक पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणी ८ जणांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पुणे जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने जाहीर केल्याप्रमाणे मराठा आंदोलनाच्या केसेस मोफत लढविण्यात येत आहेत. त्यानुसार शुक्रवारी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, अ‍ॅड. समीर घाटगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. भूपेंद्र गोसावी, अ‍ॅड. रेखा करंडे, अ‍ॅड. योगेश पवार, अ‍ॅड. नितीन झंजाड, अ‍ॅड. विजय शिंदे आणि अ‍ॅड. रवी पवार यांनी आंदोलकांच्यावतीने बाजू मांडली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोड केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी ८० जणांना अटक केली होती. त्यातील २ अल्पवयीन होते. त्यामुळे ७८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यात पाच महिलांचा समावेश आहे. या पाच महिलांतर्फे जामीन मिळावा, म्हणून अर्ज करण्यात आला होता. तो कोर्टाने फेटाळला.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण