शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 15:09 IST

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले

ठळक मुद्देराज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची चर्चामनसेकडून राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन केलं जात आहेशिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर व्यक्त केलं मत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेअयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेकडून त्यासाठीचं नियोजन देखील सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलंय. 

"राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू", असं संजय राऊत म्हणाले. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

मनसेची मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी?

दरम्यान, याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या काठावर महाआरती देखील केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. 

शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्यानं शिवसेनेनं तिथं राम मंदिराच्या आंदोलनात ऊर्जा भरण्याचं काम केलं होतं. त्यामुळे कुणी कितीही काही म्हटलं, तरी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेला पुढाकार तुम्ही नाकारू शकत नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे. अयोध्येत मंदिर कुठं आहे. रामलल्ला कुठं आहेत. कोणकोणती मंदिरं आहेत. शरयूच्या काठावर कसं जायचं अशा गोष्टींचं आम्ही नक्की त्यांना मार्गदर्शन करू", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 

शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन संपवण्याचा प्रयत्नकेंद्र सरकारकडून बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. "गेले दोन महिने शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. त्यांना देशभर सहानुभुती देखील मिळत आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती आणि पाठिंबा नष्ट करण्यासाठीच आंदोलनाला बदनाम करण्याचा कट भाजपने रचला आहे. लालकिल्ल्यावर धुडगूस घालणारे भाजपवालेच होते हे आता व्हिडिओंतून समोर येऊ लागलं आहे", असं संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAyodhyaअयोध्या