शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

राज्याचे अंतरंग जाणणारे जयस्वाल राजकारणावर प्रभाव पाडतील का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 7:28 AM

Subodhkumar Jaiswal News: फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात आलेले जयस्वाल मधल्या काळात केंद्रीय संस्थामध्ये जशी आपल्या कामाची छाप सोडत होते तशीच कामगिरी त्यांनी त्याच्याआधी महाराष्ट्रात विविध पदांवर काम करताना बजावली होती.

 मुंबई : तेलगीचा मुद्रांक घोटाळा, मालेगाव येथील दहशतवादी स्फोट, एल्गार परिषदेपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील प्रकरण. तीन दशकांत महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवन ढवळून काढणाऱ्या या प्रकरणात पोलीस अधिकारी म्हणून सुबोध कुमार जयस्वाल यांचा निकटचा संबंध आला. सुबोध कुमारांची सीबीआयमधील कारकीर्द महाराष्ट्राच्याराजकारणावर प्रभाव टाकणार का, अशा चर्चा सध्या राज्यात रंगू लागल्या आहेत.मूळचे झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील सुबोध कुमार   जयस्वाल हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयबी आणि राॅ सारख्या केंद्रीय गुप्तचर खात्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुबोध कुमार जयस्वाल यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात आणण्यात आले. आधी मुंबई पोलीस आयुक्तपद आणि नंतर राज्याचे पोलीस महासंचालकपदही त्यांनी भूषविले. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात आलेले जयस्वाल मधल्या काळात केंद्रीय संस्थामध्ये जशी आपल्या कामाची छाप सोडत होते तशीच कामगिरी त्यांनी त्याच्याआधी महाराष्ट्रात विविध पदांवर काम करताना बजावली होती.तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ उमटत होते. जयस्वाल या प्रकरणाचे तपास अधिकारी होते. पुढे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भागातही त्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. पुढील काळात दहशतवाद विरोधी पथकात असताना २००६ साली झालेल्या मालेगाव स्फोटाच्या तपासातही ते होते. मालेगाव प्रकरणानेही दीर्घकाळ राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण तापवत ठेवले होते.सुबोधकुमार जयस्वाल राज्याचे महासंचालक असताना त्यांच्याच निगराणीखाली एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगांव दंगलीचा तपास करण्यात आला. पुढे तोही सीबीआयकडे वर्ग झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस खात्याचा कारभार हाकण्यावरून सत्ताधारी शिवसेनेसोबत जयस्वालांचे संबंध ताणल्याच्या बातम्या होत्या. तर, बदल्यांबाबत होत असलेल्या हस्तक्षेपामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी त्यांचे खटके उडाले. शेवटी, जयस्वाल यांनीच केंद्रात प्रतिनियुक्ती मागितली. त्याला राज्यातील सरकारने लागलीच परवानगी बहाल करण्याची तत्परता दाखवली. चार महिन्यापूर्वी सीआयएसएफमध्ये गेलेले जयस्वाल आता सीबीआयचे प्रमुख झाले. त्याच बदल्या आणि हस्तक्षेपाच्या राजकारणाचा तपास आता सीबीआयप्रमुख म्हणून त्यांच्या पुढे असणार आहेत. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न औत्सुक्याचा बनला आहे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण