शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

राजू शेट्टी विजयाची हॅट्ट्रिक करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:10 AM

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची चिन्हे आहेत.

- विश्वास पाटीलहातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी दमछाक होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’ने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दलित व मुस्लीम मतांचेही चांगले प्रमाण आहे. ही मते सय्यद यांनी घेतल्यास शेट्टी यांच्यापुढील अडचणी वाढतील. सुरवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.शेट्टी यांची आतापर्यंतची ही पाचवी निवडणूक आहे. त्यांच्या मताधिक्याची कमान वाढती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते किती मतांनी निवडून येणार, एवढीच उत्सुकता होती; परंतु आता ही निवडणूक नक्कीच एवढी सोपी राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी बेदखल करीत असल्याच्या रागातून भाजप आघाडीतून शेट्टी बाहेर पडले व तेव्हापासून ते मोदी यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात सर्व पातळ्यांवर तयारी करून शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इचलकरंजी शहरात पाणीप्रश्नाचे भांडवल करून शेट्टी यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऊस आंदोलनात शेट्टी यांनी कारखानदारांशी उभा दावा मांडला; परंतु ‘आता काँग्रेसच्या आघाडीत जाऊन तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसला?’ असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

गेल्या निवडणुकीप्रमाणे या वेळेलाही मुख्यत: शिरोळ विधानसभा मतदारसंघात काही प्रमाणात जातीय रंग दिला जात आहे. परंतु सामान्य शेतकरी अजूनही शेट्टी यांच्या पाठीशी आहे. माझी बांधिलकी कोणत्या पक्षाशी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी आहे. त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे, ही भूमिका घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. धैर्यशील माने हे नवीन नेतृत्व आहे. शेट्टी यांच्यावर कोणतीही टीका न करता ते मला संधी द्या, असे आवाहन करीत आहेत.
>गेली सतरा वर्षे मी लोकांनी दिलेल्या वर्गणीतून ही पाचवी निवडणूक लढवीत आहे. त्यांचा विश्वास हेच माझे मोठे सर्टिफिकेट आहे. ऊस उत्पादक शेतकरी दुध उत्पादकांसह समाजातील सर्वांसाठी मी लढा देत आहे. यामुळे सामान्य जनतेत माझ्याबद्दल विश्वास आहे. हा विश्वासच मला विजयी करील, याची खात्री वाटते.- राजू शेट्टी, खासदार>विद्यमान खासदारांनी इचलकरंजीतील पाणी प्रश्न वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत मतदारसंघ विकासात मागे पडला. त्याबद्दल लोकांतून नाराजी आहे. त्यामुळे मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांंची ही नाराजीच मला विजयाच्या मार्गावर घेऊन जाईल.- धैर्यशील माने>कळीचे मुद्देऊस, दूध दराची लढाई आणि शेतकºयांच्या हक्कांसाठी खासदारकी पणाला लावली. राजकीय भूमिका बदलली तरी चळवळीच्या बांधीलकीला बट्टा लागू दिलेला नाही.‘ऊस आंदोलनात ज्यांना तुम्ही चोर म्हटले, त्यांच्याच मांडीवर जाऊन आता का बसला?’ अशी विचारणा शेट्टी यांना होत आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019hatkanangle-pcहातकणंगले