शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत का प्रवेश केला? काँग्रेसच्या त्या 18 नगरसेवकांनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 19:05 IST

Congress corporators joins NCP : विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे या पत्रकार परिषद व नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या स्वागत समारंभापासून अलिप्त राहिले.

- नितिन पंडीत भिवंडी : काँग्रेसची साथ सोडत महापौर निवडणुकीपासून काँग्रेसपासून दूर झालेल्या भिवंडी मनपाच्या १८ नगरसेवकांनी अखेर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र भिवंडी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजकारणाला वैतागून आपण राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली या १८ नगरसेवकांनी गुरुवारी मनपाचे उपमहापौर इम्रान खान यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक जावेद दळवी यांनी त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत केवळ भाजप व कोणार्कच्या नगरसेवकांना मदत केली मात्र आम्ही काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतानाही आमच्या वार्डात साधे गटर , नाले व रस्त्यांची कामे देखील झाली नाहीत. आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या वार्डातील निधीसाठी मागणी करत होतो त्यात्या वेळी आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आमच्या प्रभागांमध्ये विकासकामे झाली नसल्याने आमच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष वाढत होता. त्यामुळेच आपण काल मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या नगरसेवकांनी या पत्रकार परिषदेत दिली. 

                   विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भगवान टावरे या पत्रकार परिषद व नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या स्वागत समारंभापासून अलिप्त राहिले. त्यांच्या या अलिप्त राहिल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता याचे उत्तर भगवान टावरे स्वतः पक्ष श्रेष्ठींना देतील मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी हे आमच्या मित्र परिवारातील असून त्यांच्या शब्दाखातरच आपण आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची कबुली देखील या १८ नगरसेवकांनी दिली आहे. आमच्या पक्ष प्रवेशाने जर काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊन शहर विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील या पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी दिली आहे. 

                   दरम्यान एकही नगरसेवक नसतांना तब्बल १८ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्या स्वागत समारंभात व पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अलिप्त राहिल्याने भविष्यात काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादीत देखील शहराध्यक्षपदाच्या खांदे पालटाची शक्यता वर्तविण्यात येत असून येत्या दहा दिवसांत जावेद फारुकी शहराध्यक्ष होतील अशा घोषणा देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेत दिल्याने राष्ट्रवादीत देखील भविष्यात दोन गट पडतात कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसbhiwandiभिवंडी