शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण विरोधाचा बोलविता धनी कोण? - भाजपचा राष्ट्रवादीला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:14 IST

अमित शहा यांच्याविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांनीच मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई : अमित शहा यांच्याविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांनीच मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. अमित शहा आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे एकच असतील तर त्यांचा बोलविता धनी कोण, असा सवाल भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.मुख्यमंत्र्यांच्या जवळची माणसे मराठा आरक्षणाच्या विषयात वकीलपत्र घेत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, राज्य सरकारने श्रीहरी अणे यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली होती. पुढे त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि भाजपच्या विरोधात प्रचार केला. अणे यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातच प्रचार केला होता. ही वस्तुस्थिती आहे. उलट न्या. लोया प्रकरणात अमित शहा यांच्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्याच जयश्री पाटील या मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्त्या आहेत. सदावर्ते हे पाटील यांचे वकील आहेत. मग अमित शहा यांच्या विरोधात याचिका करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणारे एकच असतील तर याचा बोलविता धनी कोण हे आपण जनतेला सांगावे, असे आव्हान तावडे यांनी दिले.>‘सुशीलकुमार शिंदेंनी माफी मागावी’तावडे म्हणाले की, सहानुभूती मिळविण्यासाठी काँग्रेस नेते भावनिक आवाहन करीत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक माझी शेवटची असल्याचे म्हटले आहे. सोलापूरचे जे प्रश्न आज आपण मांडत आहात ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस हायकमांडचे जवळचे असताना का सोडविले नाहीत, असा सवालही तावडे यांनी केला. राजकारणातून निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही तावडे यांनी केली.काँग्रेसचे दुसरे नेते अशोक चव्हाणसुद्धा सहानुभूती गोळा करीत आहेत. आता मला वाचवा, असे ते मतदारांना सांगत आहेत. पण चव्हाण वर्षानुवर्षे राजकारणात असूनही त्यांनी जनतेची कामे केली नाहीत. सहानुभूती दाखवून नाही, जर जनतेची कामे केली तर जनता तुमच्या पाठीशी उभे राहते, असा टोलाही तावडे यांनी लगावला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा