शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:47 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

भिवंडी : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सहीने देशात चलनी नोटा चालवल्या जात असताना, मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न करत बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीतील जाहीर सभेत सरकारवर टीका केली.भिवंडीतील टावरे स्टेडियम येथे शुक्रवारी झालेल्या या सभेमध्ये एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आ. वारीस पठाण, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत आदी उपस्थित होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, या मतदारसंघातून मुंबईला पाणी जाते; परंतु येथील विधानसभा क्षेत्रात पाण्याचे प्रश्न तसेच आहेत. शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी पूर्वीच्या काँग्रेस व भाजपच्या खासदारांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना खिशातील १०रु पयांची नोट बाहेर काढून, नोटाच्या मागील मजकूर वाचण्यास सांगितले. नोटांवरील गव्हर्नरांचा संदेश त्यांनी भरसभेत वाचला व प्रतिप्रश्न केला की, जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चलनात आणल्या जातात, तर नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला असा सवाल केला.साध्वी प्रज्ञांना हद्दपार करण्याचे आवाहननरेंद्र मोदी यांनी लोकसभेत १० टक्के आर्थिक निकषांवर घेतलेला आरक्षणाचा विषय असो किंवा ट्रिपल तलाकचा विषय असो, त्यास विरोध करण्यासाठी कोणी सहकारी नव्हते. त्यासाठी मुस्लिम व अनुसूचित जातींच्या हक्काच्या संरक्षणासाठी आपल्या विचारांचे संसदेत खासदार पाठवणे जरुरीचे आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी सांगितले. अभिनेता अक्षयकुमार याने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीची त्यांनी खिल्ली उडवली. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले. मात्र भाजप अशा व्यक्तींवर कारवाई करत नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे अशा देशद्रोही प्रवृत्तींना मतदारांनी हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन ओवेसी यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019bhiwandi-pcभिवंडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी