शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Parambir Singh: परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? सोशल मीडियाच्या तोंडी एकच नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 15:36 IST

Anil deshmukh 100 crore allegation in Sachin Vaze Case: दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य चुकांमुळे करण्यात आल्याचे सांगत ही बदली नसून कारवाई असल्याचे स्पष्ट केले होते.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्लीवारीवरून परतले आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी (Parambir Singh) 100 कोटींच्या वसुलीचा लेटर बॉम्ब फोडला असा दावा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. मात्र, सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. परमबीर सिंगांच्या 100 कोटींच्या लेटर बॉम्बमागे कोण? असा प्रश्न विचारला जात असून यावर एकच नाव सकाळपासून ट्रेंड होऊ लागले आहे. (Who is behind Parambir Singh's 100 crore letter sent to CM Uddhav thackreay. allegation on Anil Deshmukh Sachin Vaze Case.)

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

दोन दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे (Sachi Vaze) प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर लोकमतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंगांची बदली अक्ष्यम्य चुकांमुळे करण्यात आल्याचे सांगत ही बदली नसून कारवाई असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून दुखावल्या गेलेल्या परमबीर सिंगांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयावर लेटर बॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची दखल आता केंद्र सरकारनेही घेतली आहे. 

Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत असा सवाल विचारला आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांनी देखील राळ उठविली आहे. या साऱ्या गदारोळात शरद पवारांनीदेखील नुकतीच पत्रकार परिषद घेत परमबीर सिंगांनी केवळ आरोप केलेत, पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे. आता या 100 कोटींच्या सचिन वाझेंना दिलेल्या वसुली मोहिमेवर सोशल मीडियात चर्चा रंगू लागली आहे. 

परमबीर सिंगांच्या या पत्रामागे कोण आहे?गेल्या काही दिवसांपासून एकतर पोलीस आयुक्त किंवा गृहमंत्र्यांची विकेट जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतू पोलीस आयुक्तांची विकेट पडली होती. शरद पवार देशमुखांवर नाराज असल्याचीही चर्चा होती. यामुळे परमबीर यांनी पाठविलेल्या पत्रामागे कोण असा सवाल विचारला जात आहे. यावर नेटकऱ्यांनी थेट शरद पवारांचेच नाव घेतले आहे. या प्रश्नावर शरद पवारांचे नाव ट्रेंड होऊ लागले आहे. 

पुढील आठवड्यात पवार पंतप्रधान होणार...एका युजरने तर शरद पवार पुढील आठवड्यात महाराष्ट्राचे पंतप्रधान बनतील अशी भविष्यवाणीच करून टाकली आहे. मनी बिलवरून भाजपाच्या विरोधात 200 खासदार आहेत. हे बिल पास करण्यासाठी ते समर्थन देणार नाहीत. असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस