शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काय उखडायची ती उखडा; शरद पवारांनी अमित शहांना खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 07:01 IST

उगीचच उंटाचा कुठलाही मुका घ्यायला जाऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खडसावले.

बारामती : बारामतीमध्ये मी आलोय ती उखडायला आलोय असं ते म्हणाले. आता हा माझी काय उखडणार कुणाला माहिती. काय उखडायची ती उखडा. उगीचच उंटाचा कुठलाही मुका घ्यायला जाऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खडसावले.बारामती आणि इंदापूर येथे शरद पवार यांची रविवारी सभा झाली. बारामती येथे पवार म्हणाले, मला पद्मविभूषण देणारे, माझं बोट धरून शिकलोय असं म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांनी काय केले म्हणून विचारतात हे हस्यास्पद आहे. हे सरकार सैन्य कारवाईचे श्रेय स्वत:ला घेत आहे. अभिनंदनची सुटका माझ्यामुळे झाली असं सांगत पंतप्रधान मोदी ५६ इंचाची छाती दाखवतात. मग आपला कुलभूषण जाधव कित्येक वर्ष पाकिस्तानात आहे. त्याला सोडवताना मात्र याच पंतप्रधानांची छाती एकदम १२ इंचाची कशी काय होते?

भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांचे शिष्टमंडळ मला भेटले. २२ महिने पगार नाही. सभासदांना ऊसाचे पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे बुडवणारे मोहिते पाटील, रणजित निंबाळकर व राहुल कुल हे मोदी यांच्या मंचावर उभे असतात. या सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. केंद्रातील सत्ताधारी मंडळी नेहमी मला विचारतात तुम्ही खाणाºयापेक्षा पिकवणाºयाचा जास्त विचार करता, मी त्यांना म्हणतो पिकवणारा जगला तरच खाणारा जगेल. 

मुख्यमंत्र्यांनी दादाची शिकवणी लावलीबारामतीत येऊन अमित शहा यांना विकास दिसत नसेल तर त्यांच्या डोळ्याचे आॅपरेशन करावे लागेल, असा टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, बेटी बचाव ही मोहीम शरद पवारांची नसून माझी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभ्यास नेहमीप्रमाणे कमीच पडतो. त्यांनी अजित पवारांची शिकवणी लावली पाहिजे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी माझ्या कामाचं कौतुक केले म्हणून त्यांचे लोकसभेचे तिकीट कापले.तू कसा आमदार होतो तेच बघतो - अजित पवारजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर टीका करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत हा कसा आमदार होतो तेच मी बघतो. अजित पवारने एकदा ठरवलं तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही हे सगळ््यांना माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी विजय शिवतारे यांना आव्हान दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019baramati-pcबारामतीAmit Shahअमित शहाSharad Pawarशरद पवार