शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

केंद्राच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी काय?; देवेंद्र फडणवीसांनी सादर केली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 20:05 IST

Budget 2021 : केंद्रानं महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद केल्याची फडणवीस यांची माहिती

ठळक मुद्देकेंद्रानं महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद केल्याची फडणवीस यांची माहितीप्रकल्पात खीळ न घालता वेगानं ते पूर्ण करण्याचं फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन

"केंद्राचा अर्थसंकल्प न वाचता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण, तो पूर्ण वाचला असता तर महाराष्ट्रासाठी किती भरीव तरतुदी आहेत, हे स्पष्ट झाले असते," असं म्हणत अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिदेत केंद्रानं महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांसाठी ३ लाख ५ हजार कोटी रूपयांची भरघोस तरतूद केल्याचं त्यांनी नमूद केलं. 

अर्थसंकल्पीय तरतूद, विविध विभागांनी विद्यमान प्रकल्पांबाबत यंदाच्या वर्षासाठी केलेली तरतूद, गुंतवणूक, केंद्राची हमी अशा विविध बाबी त्यांनी यातून मांडल्या. "हवामानाधारित शेती प्रकल्पासाठी ६७२ कोटी रूपये, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशनसाठी २३२ कोटी रूपये, दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पासाठी ३००८ कोटी रूपये, प्रत्येक घराला नळाचे पाणी या योजनेसाठी ११३३ कोटी रूपये, विदर्भ आणि मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळप्रभावित जिल्ह्यांमध्ये सिंचनसुविधांसाठी ४०० कोटी रूपये देण्यात आले आहेत. तसंच शेतकरी सन्मान निधीसाठी ६८२३.८१ कोटी रूपये आहेत," अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.पायाभूत सुविधांबाबत काय?दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या उर्वरित २६० कि.मीच्या कामांचा ३१ मार्च २०२१ पर्यंत कार्यारंभ होईल. ईस्ट-वेस्ट फ्रेट कॉरिडॉर,  भुसावळ ते खरगपूर ते डंकुनीला मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते प्रकल्पांसाठी एकूण १,३३,२५५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून यात एकूण ३२८ प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई मेट्रो-३ साठी १८३२ कोटी रूपये, पुणे मेट्रोसाठी ३१९५ कोटी रूपये, नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी  ५९७६ कोटी रूपये, नाशिक मेट्रो प्रकल्पासाठी २०९२ कोटी रूपये, मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी ४४१ कोटी रूपये दिल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.  

विद्यमान ३९ रेल्वे प्रकल्प कार्यान्वयन अथवा नियोजन किंवा मंजुरीच्या विविध टप्प्यात आहेत. त्याची एकूण किंमत ८६,६९६ कोटी रूपये इतकी आहे. यात २०१७ कि.मीच्या १६ नवीन लाईन्स (४२.००३ कोटी रूपये), ११४६ कि.मीचे ५ गेज रूपांतरण प्रकल्प (११,०८० कोटी रूपये), ३५३९ कि.मीचे १८ डबलिंग प्रकल्प (३३,६१३ कोटी रूपये) यांचा समावेश आहे. रेल्वेने यंदाच्या अर्थसंकल्पात ७१०७ कोटी रूपये महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असून ती ५०७ टक्के अधिक आहे. २००९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला प्रतिवर्षी ११७१ कोटी रूपये मिळत होते असंही त्यांनी नमूद केलं. यात अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ साठी ५२७ कोटी रूपये, वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ, पुसद मार्गासाठी ३४७ कोटी रूपये, इंदूर-मनमाड व्हाया मालेगाव मार्गासाठी ९५४७ कोटी रूपये, सोलापूर-उस्मानाबाद नवीन मार्ग व्हाया तुळजापूर साठी २०कोटी रूपये, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे गुंतवणूकीसाठी ७८९७ कोटी रूपये इतक्या प्रमुख तरतुदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.टॅक्स डिव्होल्यूशनसाठी ४२,०४४ कोटी, वित्त आयोगाचे अनुदान १०,९६१ कोटी, स्पेशल असिस्टन्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर ५२९ कोटी, सीएस/सीएसएसचे १३,४१६ कोटी रूपये याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. दरम्यान, राज्य सरकारनं प्रकल्पान खीळ न घालता ते वेगानं पूर्ण करण्याचं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbaiमुंबईMetroमेट्रो