शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:23 IST

West bengal Assembly Election 2021 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ठळक मुद्देराज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले जातील, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असे म्हणत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. (West Bengal Polls : 'Didi's 115 scams vs PM Modi's 115 schemes': Amit Shah goes all out against Mamata Banerjee)

राज्यातील पुरुलिया जिल्ह्यात आयोजित रॅलीत अमित शाह बोलत होते. यावेळी ममता दीदी तुम्हाला फ्लोराइडयुक्त पाणी देते. एकदा तुम्ही दीदीला सत्तेबाहेर जाण्याचा मार्ग दाखवा, त्यानंतर भाजपा सरकार तुम्हाला 10 हजार कोटी रुपये खर्च करुन तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी देईल, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, कम्युनिस्टांनी येथे उद्योग सुरू होऊ दिले नाहीत. यानंतर दीदींनी उद्योगांनाही बाहेर ठेवले. तृणमूल काँग्रेस असो किंवा कम्युनिस्ट कोणीही रोजगार देऊ शकत नाही. तुम्हाला रोजगार हवा असेल तर एनडीए सरकारला मतदान करावेच लागेल, असे अमित शाह म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार रुपये पाठविले जातीलपंतप्रधान मोदींनी राज्याच्या विकासासाठी ११५ योजना आणल्या. मात्र, त्यांना राज्यात राबविण्यात आल्या नाहीत. यादरम्यान, ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले. राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले जातील, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.

आदिवासींच्या हितासाठी एक बोर्ड स्थापण करण्याचा निर्णयअमित शाह यांनी राज्यातील आदिवासींच्या हिताबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले की आदिवासींच्या हितासाठी आम्ही एक बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय, राज्यभर महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी