शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

West Bengal Election Result 2021: आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 15:32 IST

West Bengal Election Result 2021: भाजप, काँग्रेस, जेडीयू, तृणमूलसाठी काम केलेल्या प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवेन, अशी घोषणा करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे. बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत असताना, किशोर यांचा अंदाज खरा ठरत असताना, त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून करत असलेलं काम थांबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते.बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का'निवडणूक रणनीतीकार म्हणून मी बरंच काम केलं आहे. ८ ते ९ वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करत आहे. मला आता आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं आहे आणि ते मी करेन. मी हे काम आयुष्यभर करणार नाही असं मी आधी अनेकदा म्हटलं आहे. आयपॅकमध्ये (इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी) माझे अनेक चांगले सहकारी आहेत. ते उत्तम काम करत आहेत. त्यांनी त्यांचं काम असंच सुरू ठेवावं,' असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी? तुम्ही राजकारणात जाणार का, असा सवाल किशोर यांना विचारण्यात आला. त्यावर किशोर यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. राजकारणात जातोय किंवा जात नाहीए याबद्दल मी काहीच बोलत नाहीए. पण आता करत असलेलं काम थांबवत आहे. आयपॅकमधील माझ्या सहकाऱ्यांनी आता आयपॅकची जबाबदारी घ्यावी. मी आता ब्रेक घेत आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे, असं किशोर यांनी सांगितलं.बंगाल निवडणूक, भाजपबद्दल काय म्हणाले होते प्रशांत किशोर?बंगालमध्ये भाजपला १०० हून अधिक जागा मिळाल्यास मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणं बंद करेन आणि दुसरं काहीतरी काम सुरू करेन, असं किशोर म्हणाले होते. बंगालमध्ये भाजपनं १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही मला दुसरं काहीतरी काम करताना बघाल. पण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करताना मी तुम्हाला कधीही दिसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस