शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

West Bengal Election Result 2021: 'लाश वही है, बस कफन बदल गया है', प.बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 14:20 IST

West Bengal Election Result 2021: मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

West Bengal Election Result 2021: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प.बंगालच्या निकालावर महत्वपूर्ण विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Maharashtra Minister and Shiv Sena leader Gulabrao Patil comment on West Bengal election result )

बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का

"मोदींचा करिष्मा आता ओसरला आहे याची जाणीव पश्चिम बंगालच्या निकालानं संपूर्ण देशाला आता झाली आहे. करिष्म्यापेक्षा राज्याचा विकास कोण करु शकतो, मातीशी कोण जुळला आहे याचा विचार मदतारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला जोरदार चपराक लगावली आहे", अशी रोखठोक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. 

बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले

पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं होतं. यात सध्याच्या आकडेवारीनुसार २०७ जागांवर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसचा पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपला फक्त ८१ जागांवर आघाडी मिळाली आहे. प.बंगालमध्ये बहुमताचा आकडा १४७ इतका आहे. 

काम कोण करू शकतो हे पाहून लोकांनी मतदान केलं"पश्चिम बंगालच्या जनतेनं राज्याचं नेतृत्व कोण करू शकतो. जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो. याचा विचार करुन ममता बॅनर्जी यांच्यावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भाजपला थेट केंद्रातून रसद पुरवली गेली. पण जनता त्याला बळी पडली नाही. भाजपकडे राज्याचे नेतृत्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला", असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Mamata Banerjeeममता बॅनर्जी