शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: बंगालमध्ये वेगळाच खेला होबे! भाजपवर उलटतेय VIP खेळी; रिकामी राहणार दिग्गजांची झोळी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 11:03 IST

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: दिग्गज नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता; खासदार असलेले भाजप नेते पिछाडीवर

कोलकाता: देशातील पाच राज्यांमधील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात होऊन तीन तास झाले असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र आता तृणमूलनं जवळपास १९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप १०० जागांच्या आसपास पोहोचताना दिसत आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. तृणमूलच्या अनेक आमदारांनी राजीनामा देऊन कमळ हाती घेतलं. तृणमूलच्या हातून बंगाल हिसकावून घेण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली. भाजपनं काही खासदारांनादेखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र यातील बरेचसे खासदार सध्या पिछाडीवर आहेत.अंदाज अपना अपना! फक्त दोन राज्यात सत्ताबदल; संजय राऊतांचा एक्झिट पोलदुसऱ्या टप्प्यातील मतमोजणीनंतर चुंचुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या लॉकेट चॅटर्जी ३३०० मतांनी पिछाडीवर आहेत. चॅटर्जी लोकसभेत हुगळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. भाजपचे आणखी एक खासदार बाबुल सुप्रियोदेखील सध्या पिछाडीवर आहेत. आसनसोलचे खासदार असलेल्या सुप्रियो यांना भाजपनं टॉलीगंजमधून उमेदवारी दिली. मात्र सध्या ते १३ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. भाजपचे स्वपन दासगुप्ता तारकेश्वर मतदारसंघात ३ हजार मतांनी मागे आहेत. माजी पत्रकार दासगुप्ता भाजपचे राज्यसभेचे खासदार होते. मात्र भाजपनं त्यांना विधानभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगितलं. 

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी